Posts

Showing posts from June, 2020

#बहिष्कार की स्वयंपूर्णता

अरे भाऊ ही बायकॉट चायना काय भानगड आहे रे .....?               अरे भाऊ , मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे फक्त एक अट आहे तो चायना नसला पाहिजे आणि मग सुरू झालं अनेक ठिकाणी पाहणी करणं ,चौकशी करणं.चायना नसलेला पण त्याच्या एवढेच बाबी ,फीचर्स ,सोयी सुविधा  समाविष्ट असलेला आणि त्याच्यापेक्षा थोडी किंमत जास्त गेली तरी चालेल पण चायना नको. आमच्यात आलेली ही अचानक राष्ट्रवादाची क्रांती एका मोठ्या आणि अगदी देशभक्त असलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या, चीनच्या आक्रमतेला चांगल्या प्रकारे जवळून अनुभवत असलेल्या सोनम वांगचुक यांनी उभी केलेल्या मोहिमेला एक प्रकारचा पाठिंबाच होता. जवळपास आम्हाला घ्यायचा असलेला मोबाईल आम्ही शोधू लागलो तेव्हा एक गोष्ट निदर्शनास आली की, आपण किती मागे पडलो आहोत टेक्नॉलॉजी उभी करण्यात. काही ठराविक भारतीय बनावटीचे आणि त्यातही काही प्रमाणात का होईना चिनी वस्तूंचा वापर असलेला मोबाईल आम्हांला भेटला मात्र आता मुख्य अडचण आली ती त्यात असलेला फीचर्सची ,कितीही शोधाशोध केली तरी भारतीय बनावटीत त्याच्या जवळपास पोहोचेल असा मोबाईल काही मिळाला नाही आणि...